दि. २५ सप्टेंबर २०२४, महाराष्ट्र पुरवठा विभाग, मुंबई ब्युरो
ration card update : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता रेशनच्या माध्यमातून नागरिकांना गहू आणि तांदळासोबत ज्वारीदेखील मिळणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यापासून रेशन दुकांनांमधून ज्वारीचे वितरण सुरू होणार आहे. हमीभावाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली ज्वारी योजनेअंतर्गत वाटली जाणार आहे, ज्यामुळे सामान्य जनतेला ही आरोग्यदायी धान्य मिळणार आहे. रेशनकार्डधारकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
जिल्हा पुरवठा विभागाचे महत्त्वपूर्ण मत जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गहू बंद करण्यात आलेला नाही, तर फक्त त्याचे प्रमाण कमी करून ज्वारीचा समावेश करण्यात आला आहे. ज्वारीसारख्या कडधान्यांचा वापर वाढल्याने आहारात पोषणमूल्य वाढेल, असे त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या आहारात संतुलन आणण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सरकारच्या या निर्णयाचा मोठा फायदा होईल.